Wednesday, 8 May 2013



                        "माजी भाजप नेताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल"




          
                                                                                       पोलीस कमीश्नर धनंजय कुलकर्णी यांनी बुधवारी
दिलेल्या माहीतीनूसार एका महिलेने मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष मधू चव्हाण यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मधू चव्हाण हे गेल्या २० वर्षापासूण पीङीत महीलेवर शारीरीक शोषण करीत होते. ज्या महीलेणे गुन्हा दाखल केला आहे, त्या मुंबई भाजपाच्या माजी कार्यकर्त्या होत्या.
                                  मात्र मधू चव्हाण यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे आहेत असे म्हटले आहे.

Saturday, 6 October 2012

इंग्लिश विंग्लिश



                                                                 इंग्लिश विंग्लिश 

     पैसे मोजले की आजकालच्या जगात कुठेही अडायला जागा नाही किंवा कोणावर विसंबूनही रहायला लागत नाही. कुठची वस्तू असो वा कुठचाही पदार्थ सगळी सुखं बाजारात हात जोडून उभी असतात. शिवाय त्यांचं बाजारी रुपडं ही चकचकीत, परफेक्ट. मोजलेल्या पैशाला पुरेपूर वसुली देणारं असं. आपल्या सगळ्यांच्या मनाला हा कमर्शिअल आनंद घ्यायची सवय लागली आहे... पण या ठराविक प्रवाहातून जात असताना कधीतरी एक दिवस कुठेतरी घरगुती ओलाव्याचा स्पर्श होतो आणि अचानक काहीतरी दूर गेलेलं गवसल्यासारखं वाटायला लागतं. प्रवाहाला छेद देणारा हा छोटासा ओढ बघता बघता साचेबद्ध झालेल्या आपल्या चित्तप्रवृत्ती पुन्हा एकदा जिवंत करतो. 

shreedevi.jpg 

या सिनेमाचं अविभाज्य बलस्थान म्हणजे शशी साकारणारी अभिनेत्री श्रीदेवी. जेवढा हा सिनेमा दिग्दर्शिकेचा आहे, तितकाच तो श्रीदेवीचा आहे. कमबॅक करणाऱ्या इतर अभिनेत्रींप्रमाणे दिंडोरे न पिटता तिने इथे पूर्णपणे शशीला उभं केलंय. तिचा समाधानी स्वभाव. कुठच्याही परिस्थितीत समजून घ्यायची वृत्ती. मुलांशी आई म्हणून असलेलं नातं. नवऱ्याच्या कौतुकाच्या एका शब्दासाठी आसुसलेले डोळे. जेवण करताना होणारा आनंद. स्वतःबद्दलची लोपलेली भावना आणि स्वतःसाठी काहीतरी करताना आलेलं चोरटेपण तिने अगदी सहज उभं केलंय. यात धाकट्या मुलाच्या हट्टापायी आसपास कोणी नसताना साडी खोचून साकारलेला मायकल जॅक्सन पाहताना एकेकाळी जमाना गाजवलेल्या मिश्किल श्रीदेवीची आठवण येते आणि आपण पुन्हा श्रीदेवीचे फॅन होतो. सुलभा देशपांडेंना पडद्यावर पहायला बरं वाटतं. इतर कलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे. गाणी सिनेमाइतकीच मनात रेंगाळतात आणि गाण्याचे शब्द आपोआप ओठांवर पक्के होतात. 
                          
                                     
एकूणच हा सिनेमा खूप वेगळा आहे. सध्याच्या चाकोरीबद्ध चकचकाटापेक्षा कितीतरी वेगळा. यात खूप काही घडत नाही. पण तरीही जे घडत ते थेट आत स्पर्शून जातं. यात तिचं इंग्रजी शिकणं, हा केवळ एक छोटासा भाग. पण त्याला जोडून अनेक पदर आहेत. जे आपल्या नेहेमीच्या आयुष्यात आपल्या वाट्याला येतात पण कधी जाणवतही नाहीत. या सिनेमाच्या दोन तास दहा मिनिटातला प्रत्येक क्षण तुम्हाला खिळवून ठेवतो आणि सिनेमा जेव्हा संपतो तेव्हा नकळतच डोळ्याच्या कडा ओलावलेल्या असतात. ओठांवर समाधानाचं हसू असतं आणि मनात परिपूर्णतेचा आनंद असतो. 
अजून काय हवं?......                                




                                                नितीन पवार